IMD Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra Weather Forecast) गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी (IMD Monsoon Alert) दिसून येत आहे. आज रविवारीही राज्यातील (Maharashtra News) अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह (Kokan) मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई (Mumbai), मध्य महाराष्ट्रासह (Madhya Maharashtra) ठाणे (Thane) जिल्ह्यातही आज वरुणराजा बरसणार आहे. हवामान विभागाकडून (IMD) कोकण विभागाने ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert Today) जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department ) जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), गोव्यात (Goa) मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा


दक्षिण कोकण-गोवा किनार्‍यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा उत्तर-ईशान्येकडे सरकला असून 30 सप्टेंबर 2023 रोजी दक्षिण कोकण किनार्‍याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रावर 17.30 IST वर केंद्रीत झाला. आज रात्रीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कोकण-गोवा किनारा, पणजी ते रत्नागिरी दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे.






'या' भागात अतिवृष्टीचा इशारा


1 ऑक्टोबर रोजी 12.15 रात्री नवीन उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड या भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी जमीन खचण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.






देशातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट


भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण विभाग, अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा, गोवा, केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीसह देशातील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दक्षिण कोकण-गोवा किनार्‍यालगत पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणि ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.