ISRO Space Mission : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आणि आदित्य एल-1 (Aditya L-1) मोहिमेमंतर (Space Mission) आता भारताचं (India) लक्ष्य शुक्र (Venus) ग्रहावर आहे. मंगळ (Mars), चंद्र (Moon) आणि सूर्य (Sun) मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रो (ISRO) शुक्र मोहिमेसाठी (Venus Mission) सज्ज झाली आहे. इस्रोकडून आता शुक्रयान मोहिमेच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. शुक्र ग्रहावरील (Planet Venus) वातावरण आणि त्यांच्या प्रभाव यांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येणार आहे.


इस्रोची आता शुक्रावर नजर


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख सोमनाथ यांनी शुक्रयान मोहिमेसंदर्भात माहिती दिली आहे. इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी सांगितलं की, शुक्र ग्रहावरील वातावरणाबाबत संशोधनासाठी इस्रो तेथे एक मोहिम राबवणार आहे. शुक्र ग्रहाचं वातावरण आणि तेथील आम्लीय वायूंबाबत समजून घेण्यासाठी एक मोहिम हाती घेतली जाणार आहे. राष्ट्रीय विज्ञान अकादमी (National Sciance Academy) मध्ये व्याख्यान देताना इस्रो प्रमुखांनी शुक्रयान मिशनबाबत माहिती दिली आहे.


चंद्र आणि सूर्यानंतर शुक्र मोहिम


जर आपण शुक्र आणि मंगळ ग्रहांवर जीवन का नाही. या ग्रहांबाबत अधिक खोलवर समजून घेण्यासाठी तिथे मोहिम पाठवणं आवश्यक आहे. इस्रो प्रमुखांच्या या वक्तव्याच्या काही महिन्यांपूर्वी इस्रोच्या एका शास्त्रज्ञाने शुक्रयान मोहिमेला विलंब होऊ शकतो, असा दावा केला होता. इस्रोकडून शुक्रयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, शासनाकडून शुक्रयान मोहिमेसाठी अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.


शुक्र ग्रहाभोवती आम्लीय ढगांचं वातावरण 


शुक्र ग्रहाभोवती ढगांचा थर जमा झाला आहे. त्यामध्ये आम्ल भरलेलं असतं. त्यामुळे कोणतेही अंतराळयान किंवा वाहन आम्लीय ढगांचे वातावरण ओलांडून शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचू शकत नाही. सूर्यमालेच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळविण्यासाठी शुक्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे.


गगनयान भारताची सर्वात मोठी अंतराळ मोहीम





 

महत्वाच्या इतर बातम्या : 


Planet of Diamonds : काय सांगता... हिऱ्यापासून बनलेला ग्रह, पृथ्वीपासून इतक्या दूर आहे 'हा' ग्रह; जाणून घ्या सविस्तर...