Chandigarh Mayor Poll Case : चंदीगड निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. जी आठ मतं निवडणूक अधिकाऱ्याने खाडोखोड करून अवैध ठरवली होती, ती सर्व मतं ही सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आणि आप पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसचे फेरफार करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 


चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये मतामंध्ये फेरफार केलेल्या निवडणूक अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने आज चांगलंच फटकारलं. या प्रकरणात सर्व 8 मतं ही न्यायालयाने वैध ठरवली असून त्यानंतर आता पुन्हा मतमोजणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे बाद करण्यात आलेल्या आठ मतपत्रिकांसह पुन्हा मतमोजणी घेण्यात आली आणि आप पक्षाचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. 


 




सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातील 8 मतांचा अवैध ठरवल्याच्या वादावर सुनावणी घेतली. त्यानंतर चंदीगड महापौरपदाची निवडणूक ही पुन्हा घेण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात न्यायालयाचा अवमान झाल्याचंही निरीक्षण नोंदवलं आहे. 


पुन्हा मतमोजणीचे निर्देश


राजकारणातील घोडेबाजार हा अत्यंत चिंताजनक विषय बनला आहे अशी चंदीगड महापौर निवडणूक प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाने टीप्पणी केली. तसेच नव्याने होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ न्यायालयात सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. 


आम आदमी पार्टी-काँग्रेस आघाडीचा विजय 


महापौरपदाच्या निवडणुकीत या मतांची पुनर्मोजणी झाल्यानंतर महापौरपदाच्या शर्यतीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडीचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. ही सर्व मते कोणतेही ठोस कारण न देता फेटाळण्यात अवैध ठरवण्यात आली होती. 


 






निवडणूक अधिकाऱ्याचा कारनामा कॅमेऱ्यात कैद


सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालय गेल्या महिन्यात झालेल्या महापौर निवडणुकीत झालेल्या मतांची पुनर्मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत. रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध घोषित केलेली ती सर्व 8 मते कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ही सर्व मते आम आदमी पक्षाच्या बाजूने आहेत.


चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांचा राजीनामा


चंदीगड महापौर निवडणुकीत कथित हेराफेरीबाबत निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्यावरील आरोपांवर सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालय आम आदमी पार्टी आणि काँग्रेस आघाडीकडून महापौरपदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. कुलदीप कुमार यांनी रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांच्यावर मतदानादरम्यान फसवणूक केल्याचा आरोप केला होता.


दरम्यान, नाट्यमयी राजकीय घडामोडीनंतर विजयी झालेल्या चंदीगड महापौरांनी राजीनामा दिला आहे. चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्वीच राजीनामा दिला आहे. तर दुसरीकरे फेरफार करणारे निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकांवर खाडाखोड केल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता खटला चालणार आहे. 


ही बातमी वाचा: