Chandigarh News : चंदीगडमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहे. नाट्मयी राजकीय घडामोडीनंतर विजयी झालेल्या चंदीगड महापौरांनी राजीनामा दिला आहे. चंदीगडचे महापौर (Chandigarh Mayor) मनोज सोनकर (Manoj Sonkar) यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्वीच राजीनामा दिला आहे. महापौरांच्या राजीमान्यामुळे चंदीगडच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे. भाजप चंदिगड युनिटचे प्रमुख जतिंदर पाल मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, मनोज सोनकर यांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे.


चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांचा राजीनामा


आज, 19 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात चंदीगड महापौर निवडणुकीत कथित हेराफेरीबाबत निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्यावरील आरोपांवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालय आम आदमी पार्टी आणि काँग्रेस आघाडीकडून महापौरपदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. कुलदीप कुमार यांनी रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांच्यावर मतदानादरम्यान फसवणूक केल्याचा आरोप केला होता.






सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीआधी राजीनामा


महापौरपदाच्या निवडणुकीतील कथित छेडछाडीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या एक दिवस आधीच महापौर मनोज सोनकर यांनी राजीनामा दिली आहे. त्यांनी मतदानांत बाजी मारली होती. सोनकर यांनी आपचे कुलदीप कुमार यांचा पराभव करून 'इंडिया आघाडी'विरुद्ध पहिली निवडणूक जिंकली होती. एक महिन्यापूर्वी, 30 जानेवारीला मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांचा विजय झाला होता. भाजपला 16 मते मिळाली होती आणि काँग्रेस आणि आपचे संयुक्त उमेदवार कुलदीप सिंग यांना 12 मते मिळली. काँग्रेस आणि आपच्या उमेदवाराच्या बाजूने पडलेल्या 20 मतांपैकी आठ मते अवैध घोषित करण्यात आली होती, जी या निकालाचा टर्निंग पॉईंट बनली.






मतपत्रिकेशी छेडछाड करतानाचा व्हिडीओ व्हायरल


30 जानेवारी रोजी महापौरमदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच, काँग्रेस आणि आप नगरसेवकांनी भाजपवर फसवणूक केल्याचा आणि योग्य निवडणूक प्रक्रियेचे पालन न केल्याचा आरोप केला, यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. त्यांनी अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकेशी छेडछाड करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला, दरम्यान, हा आरोप भाजपने फेटाळून लावला. 






सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मतमोजणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर  म्हटलं की, "हे रिटर्निंग ऑफिसरचे वर्तन आहे का? तो कॅमेऱ्याकडे पाहतो आणि मतपत्रिकांसोबत स्पष्टपणे छेडछाड करतो''. न्यायालयाने नियुक्त कौन्सिल सदस्य मसिह यांना 19 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chandigarh Mayor Election News: चंदीगड महापौर निवडणुकीत 'गेम' झाला; विरोधकांची आठ मते बाद, भाजप उमेदवार विजयी