Weather News : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका जाणावत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होऊन पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार,  11 ते 14 मार्च या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात हलका आणि मध्यम पावसाची नोंद होऊ शकते. जम्मू-काश्मीरसह लडाख-गिलगिटबाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे. पंजाब, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि केरळमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.


10 तारखेला म्हणजे उद्या जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिटबाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 11 ते 14 मार्च दरम्यान या प्रदेशात विजांच्या कडकडाटासह या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 ते 14 मार्च दरम्यान उत्तराखंडमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. 12 ते 14 दरम्यान पंजाबमध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 13 आणि 14 मार्च रोजी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडू शकतो. आज दक्षिण राजस्थान वगळता उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात जोरदार पृष्ठभागावरील वारे (25-35 किमी प्रति तास) वाहण्याची शक्यता आहे.


हवामान खात्याने काय म्हटले?


रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल आणि केरळमध्ये पुढील 3 दिवसांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअस जास्त राहण्याची शक्यता आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम पुढील आठवड्यात पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं हिमाचल प्रदेशात वादळ आणि पाऊस पडेल. 13 आणि 14 मार्च रोजी हिमालयीन राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 11 ते 13 मार्च दरम्यान हिमाचल प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा जारी केला आहे.


12 आणि 13 मार्च रोजी पंजाबमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 12 आणि 13 मार्च रोजी पंजाबमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेशात पुढील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. तर आठवड्याच्या उत्तरार्धात 9 मार्च रोजी किनारपट्टी भागाह आंध्र प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका पाऊस पडू शकतो. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि ओडिशामधील विविध भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. कर्नाटकात मार्च ते मे या उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर मार्चमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार नाही. या महिन्यात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळं राज्यातील काही भागांमध्ये लोकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल.


महत्वाच्या बातम्या:


Weather Update : पुढील 4-5 दिवसांत राज्यातील तापमानात होणार वाढ, पुढचे 24 तास तुमच्या शहरातील हवामान कसे असेल? जाणून घ्या