नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सातही मारेकऱ्यांची सुटका करण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे.
21 मे 1991 रोजी चेन्नईमध्ये राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.
तामिळनाडू सरकारने दोन वर्षात दुसऱ्यांदा केंद्र सरकारला पत्र लिहून सातही मारेकऱ्यांच्या शिक्षेवर पुनर्विचार करुन त्यांची सुटका करण्याची विनंती केली आहे.
पहिलं पत्र फेब्रुवारी 2014 मध्ये यूपीए सरकारच्या कार्यकाळात पाठवण्यात आलं होतं.
"हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने, मारेकऱ्यांची सुटका करण्याचा अधिकार सरकारला नाही," असं उत्तर गृहंमंत्रालयाने तामिळनाडू सरकारला दिलं आहे.