Corona Vaccine | कोरोनाविरूद्धच्या लढ्यात भारत परदेशात बनवलेल्या आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींच्या वापरास मान्यता देण्याची शक्यता आहे. लसीकरण गतिमान करण्यासाठी नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ वॅक्सिन अॅडमिनिस्टेशन फॉर कोविड 19 (NEGVAC) ने सरकारला हा प्रस्ताव दिला आहे. परदेशात निर्माण झालेल्या विविध लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. अशा लसी भारतात आयात केल्या पाहिजेत, असा प्रस्ताव NEGVAC केला, जो भारत सरकारने मान्य केला आहे.
NEGVAC च्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, USFDA, EMA, UK MHRA, PMDA, JAPAN यांनी आपत्कालीन मंजुरी दिलेल्या लसी आणि WHO च्या यादीत सामील असलेल्या लसींना भारतात आपत्कालीन वापरास मान्यता द्यावी. NEGVAC चा हा प्रस्ताव भारत सरकारने मान्य केला आहे.
NEGVACच्या प्रस्तावानुसार औषध नियामकाने आपत्कालीन मंजुरी दिलेली परदेशी लसी प्रथम केवळ 100 लोकांना दिल्या जातील आणि त्यांचे सात दिवस निरीक्षण केले जाईल. कोणत्याही प्रकारची समस्या नसल्यास, लसीकरण मोहिमेत त्यांचा समावेश केला जाईल. म्हणजेच, देशात क्लिनिकल ट्रायलशिवाय त्याला केवळ ब्रिज ट्रायल्सवर या लसींना परवानगी दिली जाईल.
भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींनंतर रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात या लसीचे दरवर्षी 85 कोटी डोसेसची निर्मिती केली जाणार आहे. काही मर्यादित डोसेस एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशात सुरु असलेल्या लसीच्या तुटवड्याची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
Sputnik V लस घेतल्यानंतर दोन महिने दारुचे सेवन नको, रशिया सरकारचा नागरिकांना सल्ला
स्पुटनिक V लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचं डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने म्हटलं आहे. ही लस भारतात क्लिनिकट ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात असून डॉ. रेड्डीजने फेब्रुवारी महिन्यात लस आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी भारतीय औषध नियामकांकडे पाठवली होती. अखेर काल या लसीला मंजुरी मिळाली आहे.