CDS Bipin Rawat Helicopter Crash : तामिळनाडूतील कन्नूरमध्ये हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त (IAF Chopper Crash) झालं. ज्यामध्ये देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. या दुर्घटनेप्रकरणी हवाई दलानं ट्राय सर्विस कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीची स्थापना केली आहे. ही चौकशी समिती हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या कारणांचाही शोध घेणार आहे. हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 


हवाई दलानं आपल्या ट्विटर हँडलमध्ये म्हटलंय की, "ही चौकशी जलद गतीनं करण्यात येणार आहे. तसेच अपघाताची काणं आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचाही प्रयत्न असणार आहे. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत मृतांचा पूर्ण सन्मान राखला जावा आणि कोणतीही चुकीची माहिती किंवा अनुमान करणं टाळावं, असं आवाहन हवाई दलाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


नेमकी दुर्घटना कशी घडली?


लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.  या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या आर्मी बेस कॅम्प परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.   


प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं.  वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. 


पाहा व्हिडीओ : General MM Naravane पुढील सीडीएस होणार? कोण आहेत Manoj Mukund Naravane?



IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर 


दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.  हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं. 


कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत? 



  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती. 

  • बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

  • बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.

  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले. 

  • रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

  • सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.


दरम्यान, तामिळनाडूतील कन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यापैकी केवळ एकजण बचावले आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले आहेत. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?


देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह