CCI Penalty On Google: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (Competition Commission of India-CCI) जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल या अमेरिकन कंपनीला 1,337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉइड मोबाईल डिव्हाइस सेक्टरमध्ये अनेक मार्केटमध्ये स्वतःची चांगली स्थिती असल्याचा गैरवापर केल्यामुळे गुगलवर ही कारवाई करण्यात आली आहे.
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) गुगलला अयोग्य व्यवसाय थांबवण्याचे (Unfair Business Practices) निर्देश दिले आहेत. आयोगाने गुरुवारी अधिकृत माहितीत सांगितले की, गुगलला निर्धारित वेळेत त्यांच्या कामकाजात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
CCI इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की "अँड्रॉइड मोबाइल डिव्हाइस इकोसिस्टममधील एकाधिक मार्केटमधील आपल्या स्थितीचा गैरवापर केल्याबद्दल Google ला हा दंड ठोठावण्यात आला आहे."
या कारणामुळे दंड ठोठावण्यात आला
Google Android OS चालवते आणि व्यवस्थापित करते. त्यासाठी ते इतर कंपन्यांना परवानेही देतात. Google च्या OS आणि अॅप्सचा वापर OEMs म्हणजेच मूळ उपकरणे उत्पादक त्यांच्या मोबाइल डिव्हाइससाठी करतात. OS आणि अॅपच्या वापराबाबत अनेक प्रकारचे करार केले जात आहेत, जसे की मोबाइल अॅप्लिकेशन वितरण करार ((Mobile Application Distribution Agreement-MADA). याचाच गैरवापर केल्याचा गुगलवर आरोप आहे.
2018 मध्येही ठोठावण्यात आला होता दंड
दरम्यान, CCI ने 8 फेब्रुवारी 2018 रोजी देखील Google ला 135.86 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळेसही त्यामागील CCI ला गुगलला ऑनलाइन सर्च आणि जाहिरात मार्केटमध्ये आपल्या मजबूत स्थितीचा गैरवापर केल्याबद्दल दोषी असल्याचे आढळले होते. Google वर दंडाची रक्कम 135.86 कोटी रुपये होती. जी कंपनीने आर्थिक वर्ष 2013, 14 आणि 15 मध्ये भारतात कमावलेल्या सरासरी कमाईच्या 5 टक्के होती.
इतर महत्वाची बातमी:
Defense Expo 2022 : डिफेन्स एक्स्पोमध्ये स्वदेशी एम-4 लढाऊ वाहन प्रदर्शित, पूर्व लडाखमध्ये आहे तैनात