नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पगार येण्याची शक्यता मावळली आहे. प्रॉव्हिडंट फंडाच्या बाबतीत कोणतीही घट होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पीएफ कट 10 ऐवजी 12 टक्के ठेवण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे.

आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारातून पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा होत होती. ती रक्कम आता 10 टक्क्यांवर येण्याची शक्यता होती. मात्र, 12 टक्के रक्कमच पगारातून पीएफमध्ये जमा होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

दरम्यान, सामाजिक सुरक्षा योजना धोक्यात येतील या कारणास्तव कामगार संघटनांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यामुळे याबाबतील सरकार 12 टक्केच रक्कम प्रॉव्हिडंट फंडामध्ये जमा करण्याच्या निर्णयावर ठाम राहिलं आहे.