मुंबई : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. तर आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे.


कोणत्या वेबसाईट्सवर रिझल्ट पाहाल?

रिझल्ट कसा पाहाल?

  • वेबसाईट ओपन करा.

  • त्यानंतर ‘CBSE 12th Result 2017’ या लिंकवर क्लिक करा.

  • आवश्यक माहिती भरा.

  • ‘सबमिट’वर क्लिक करा. त्यानंतर रिझल्ट ओपन होईल.


दरम्यान, एचएसई बोर्डाच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे. सोमवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत निकालाची तारीख जाहीर होणार आहे. त्यामुळे येत्या 30-31 मेपर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.