नवी दिल्ली : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) एकाच दिवशी, काही तासांच्या कालावधीत 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. या अधिकृत वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र यांसारखे तपशील नोंद करावे लागतील.
सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. यंदा दहावीच्या परीक्षा 21 मार्चला संपल्या. तर बारावीची परीक्षा 5 एप्रिलपर्यंत चालली होती. आकडेवारीबद्दल सांगायचे तर, या वर्षी 10 वी आणि 12 वीचे एकूण 39 लाख (38,83,710) पात्र विद्यार्थी होते. त्यामध्ये 10 वीचे 21 लाख (21,86,940) आणि 12 वीचे सुमारे 17 लाख (16,96,770) विद्यार्थी होते.
CBSE Exam Result 2023 : निकाल कधी जाहीर होणार?
सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर निकालाची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही. परंतु सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत निकाल जाहीर होतील. परीक्षेचा निकाल जाहीर करण्याच्या तारखा CBSE द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाइट, ट्विटर हँडल आणि इतर सोशल मीडियावरुन जाहीर केल्या जातील.
CBSE Exam Result 2023 : निकाल कसा पाहायचा?
विद्यार्थी त्यांचे निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर पाहू शकतात. तसेच CBSE चे निकाल डिजिलॉकरवर देखील उपलब्ध असतील. निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक असेल. याशिवाय इतर कोणत्याही माहितीसाठी विद्यार्थी अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
या ठिकाणी पाहा निकाल,
CBSE Exam Result 2023 : दहावीची 76 विषयांसाठी तर बारावीची 115 विषयांसाठी परीक्षा
सीबीएसईने यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 76 विषयांसाठी घेतली आणि इयत्ता बारावीची परीक्षा एकूण 115 विषयांसाठी घेतली. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 7240 केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले होते. तर बारावीच्या परीक्षेसाठी 6759 केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर, सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 12 लाख 47 हजार 364 मुले आणि 9 लाख 38 हजार 566 मुली बसल्या होत्या. तर बारावीच्या परीक्षेत 9 लाख 51 हजार 332 मुले आणि 7 लाख 45 हजार 433 मुलींनी परीक्षा दिली.
ही बातमी वाचा :