CBSE 10th 12th Revised Exam Date Sheet 2021: सीबीएसईने दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करुन सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईने हा बदल 14 मे रोजी होणाऱ्या रमजान सणामुळे केला आहे. आधी 13 आणि 15 मे रोजी परीक्षा होणार होती. पण आता सुधारित वेळापत्रकानुसार 12 मे 2021 ते 17 मे 2021 पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

सीबीएसईद्वारे 10 वी 12 वीच्या सुधारित वेळापत्रकानुसार 13 मे रोजी असणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा फिजिक्सचा पेपर आता 8 जून 2021 ला घेण्यात येणार आहे. गणिताचा पेपर आता 1 जून ऐवजी 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. 12 वीचा भूगोलचा पेपर आता 2 जून ऐवजी 3 जूनला होईल. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचा विज्ञानाचा पेपर 21 मे आणि गणिताचा पेपर 2 जूनला होणार आहे.

सीबीएसईद्वारे जाहीर केलेले सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या ऑफिशिअल पोर्टलवर अपलोड केले आहे. सीबीएसई बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नविन वेळापत्रक डाऊनलोड करु शकतात.

सीबीएसई बोर्डची दहावीची परीक्षा 4 मे 2021 पासून सुरु होणार असून 7 जूनला संपणार आहे. तर बारावीची परीक्षा 11 जूनला संपणार आहे. या विद्यार्थ्यांची बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा 1 मार्चपासून सुरु झाली आहे. प्रॅक्टिकल परीक्षा शाळांमध्ये घेण्यात येत आहेत. सीबीएसईच्या नोटिफिकेशननुसार बोर्ड परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत घोषित करण्यात येणार आहेत. सीबीएसई बोर्ड पहिल्यांदाच 12 वीच्या परीक्षेचं दोन शिफ्टमध्ये आयोजन करत आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10:30 ते 1:30 आहे, तर दुसरी शिफ्ट दुपारी 2:30 ते 5:30 ची आ

Education Loan Information:

Calculate Education Loan EMI