नवी दिल्ली : CBSE च्या दहावी परीक्षेचा निकाल CBSE Board 10th Result 2020 आज म्हणजे 15 जुलै रोजी लागण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होईल. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात 15 जुलै पूर्वी निकाल जाहीर करु असं आश्वासन दिलं होतं.


सीबीएसई दहावीच्या निकालाची उत्सुकता आज संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज निकाल नाही जाहीर झाला तर उद्या नक्की जाहीर केला जाऊ शकतो अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. उद्या निकाल जाहीर होण्याची शक्यता असेल तर आज सायंकाळपर्यंत त्याविषयीची अधिकृत घोषणाही होऊ शकते.


सीबीएसईने अजून दहावी निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.


मात्र सीबीएसईने स्वतःहून सर्वोच्च न्यायालयात 15 जुलैपूर्वी म्हणजेच उद्या सायंकाळपर्यंत निकाल जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयानेही ते मान्य केलं होतं. त्यामुळे आज सायंकाळ किंवा उद्या सायंकाळपर्यंत सीबीएसईला निकाल जाहीर करावा लागेल किंवा निकालाची अधिकृत तारीख जाहीर करावी लागेल.


बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही फक्त वेबसाईटवर जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सीबीएसईकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. तसंच आयसीएसई किंवी सीबीएसई बारावीप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकरमध्ये अपलोड केलं जाण्याची शक्यता आहे.


सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर दहावीच्या निकाल पाहण्याच्या लिंकवर क्लिक करा. ही लिंक नव्या टॅबमध्ये ओपन होईल किंवा नवं पेजवर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. या नव्या पेजवर तुम्हाला निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि हॉलतिकीट आयडी भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल.


संबंधित बातम्या


SSC, HSC Results Dates | दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड  


CBSE 12th Result 2020 | सीबीएसई बारावीच्या परीक्षेत देशभरातून 88.78 विद्यार्थी उत्तीर्ण


CBSE 12th Result 2020 | सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गुणवत्ता यादी नाही 


दहावी, बारावीच्या गुणपत्रिकांसाठी Digilocker App डाऊनलोड करा; CBSE चा विद्यार्थ्यांना एसएमएस