CBI वाद : सुप्रीम कोर्टाने सीव्हीसीच्या अहवालावर आलोक वर्मांचे उत्तर मागवले
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2018 01:07 PM (IST)
सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणावर सीव्हीसीने आज त्यांचा अहवाल सुप्रीम कोर्टासमोर सादर केला. त्यावर सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
नवी दिल्ली : सीबीआय विरुद्ध सीबीआय या प्रकरणाचा फैसला पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला आहे. या प्रकरणी सीव्हीसीने आज त्यांचा अहवाल सुप्रीम कोर्टासमोर सादर केला. त्यावर झालेल्या सुनावणीत सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या बेंचने वर्मा यांना क्लीन चीट दिलेली नाही. या अहवालावर 19 नोव्हेंबरपर्यंत वर्मा यांनी स्पष्टीकरण द्यावे असे आदेशही न्यायालयाने त्यांना दिले आहेत. मंगळवारी (20 नोव्हेंबर) याप्रकरया प्रकरणी पुढील सुनावणी गेण्यात येईल. काय आहे सीव्हीसीच्या अहवालात 'सीव्हीसीच्या आहवालामध्ये आलोक वर्मा यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची चौकशी करण्याची गरज रंजन गोगोई यांनी व्यक्त केली.