चेन्नई : माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या घरावर आज सीबीआयनं छापा मारला. सीबीआयनं पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका नटराजन यांच्यावर ठेवला आहे. कलम 120 बी नुसार एफआयआरही सीबीआयनं दाखल केली आहे.


यूपीएच्या कार्यकाळात जयंती नटराजन पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत होत्या. आपल्या कार्यकाळात झारखंडमधील पर्यावरणविषयक परवानग्या त्यांनी दिल्या होत्या. तसंच 200 हेक्टर जमीन देताना त्यांनी नियमांना केराची टोपली दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान जयंती नटराजन यांनी आपल्या कार्यकाळात राहुल गांधींच्या दबावामुळे झारखंडमधील प्रकल्पांना पर्यावरणविषयक परवानग्या दिल्याचा आरोप आहे. जयंती नटराजन यांनी 2015 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला होता.

जयंती नटराजन यांचा काँग्रेसला राम राम! कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्टीकरण..

माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्याकडून राहुल गांधींची पोलखोल