नवी दिल्ली : सैन्य दलात स्त्री-पुरुष भेदभाव संपवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सैन्यात जवळपास 800 महिलांची भरती केली जाणार आहे. यामध्ये 52 महिला जवानांची भरती दरवर्षी केली जाईल. देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी पदभार स्वीकारताच दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला.
सैन्य दलात महिलांना क्रमाक्रमाने काश्मीर घाटीमध्ये तैनात केलं जाईल. ज्यामुळे महिला जवानाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कामांची जबाबदारी देता येईल. सैन्यात महिलांचा समावेश केल्याने लैंगिक गुन्ह्यांचा शोध घेणं सोपं होईल, असं सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
सैन्यात महिलांना लढाऊ भूमिका देण्याची सुरुवात म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. सैन्यात सध्या महिल्यांना वैद्यकीय, कायदा, शैक्षणिक, सिंग्नल किंवा अभियांत्रिकी असा निवडक विभागांमध्ये काम करण्याची परवानगी आहे.