CBI Raids Lalu Yadav : चारा घोटाळा प्रकरणी नुकतेच तुरुंगातून जामिनावर सुटलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव (lalu Prasad Yadav) यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय त्यांच्या 17 ठिकाणी छापे टाकत आहे. सीबीआयचे (CBI) पथक माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानीही पोहोचले आहे.


ओळखीच्या अनेकांना रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप 
लालू यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या ओळखीच्या अनेकांना रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात यादव कुटुंबीयांना स्वस्त दरात जमीन मिळाली. सीबीआयला संशय आहे की, या प्रकरणात जमीन खरेदीच्या बदल्यात पैसे दिले गेले नाहीत.


17 ठिकाणी छापे
लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात एक कोटी 20 लाख रुपये आल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय लालू यादव यांच्या नातेवाईकांना दिल्ली, पाटणा, दानापूरसह अनेक ठिकाणी जमिनी मिळाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय टीम दिल्ली आणि बिहारमधील पाटणा आणि गोपालगंजमध्ये 17 ठिकाणी छापे टाकत आहे.


सीबीआयची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप


सीबीआयच्या छाप्याबाबत आरजेडी नेते आणि आमदार आलोक मेहता यांनी आरोप केला आहे की, सीबीआयची कारवाई पूर्णपणे पक्षपाती आहे. तसेच एक जोरदार आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, लालू यादव सध्या दिल्लीत आहेत. त्यांची मुलगी मीसा भारतीही दिल्लीत आहे. राबडी देवी त्यांच्या निवासस्थानी आहेत. लालू 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mathura Mosque : अयोध्या, काशी, आता मथुरा.. कृष्णजन्मभूमी प्रकरणी मथुरेत 'मशीद हटाओ' खटल्याला परवानगी


Gyanvapi Masjid: ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश; शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी, नमाज पठण करण्यास बंदी नाही


Places of Worship Act : हिंदूंना ज्ञानवापी हक्क मिळेल ? काय सांगतो 1991 चा धार्मिक स्थळ कायदा


Share Market Updates : शेअर बाजार काल कोसळला, आज सावरला; सेन्सेक्सची 1000 अंकानी भरारी