Share Market Updates : गुरुवारी कोसळलेला शेअर बाजार आज सावरला असल्याचे दिसून आले आहे. मागील दोन दिवस तुफान विक्री झालेल्या शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांक 16050 अंकावर ट्रेड करत आहे. तर, सेन्सेक्सने 1000 अंकानी वधारला होता. आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. अमेरिकन शेअर बाजारात घसरण कायम राहिली होती. 


आज बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 665.12 अंकानी वधारला. निफ्टीने सुरुवातीलाच 16000 अंकाचा टप्पा ओलांडला.


टाटा मोटर्सचा शेअर दर 4.5 टक्क्यांनी वधारला. अशोल लेलँडचा शेअर दर वधारला. ऑटो क्षेत्रातील शेअर दर वधारले आहे. 


टाटा मोटर्सचा शेअर दर 4.5 टक्क्यांनी वधारला. अशोल लेलँडचा शेअर दर वधारला. ऑटो क्षेत्रातील शेअर दर वधारले आहे. 


हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली. टाटा स्टीलचा शेअर दर 5.17 टक्क्यांनी वधारला आहे. जेएसडब्लू स्टीलमध्ये 5.13 टक्क्यांनी वधारला. 


गुरुवारी काळा दिवस 


गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. जवळपास सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी, तर निफ्टी 430 अंकानी घसरला होता. सेन्सेक्समध्ये 2.61 टक्क्यांची घसरण होऊन तो 52,792 वर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 2.65 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,809 वर बंद झाला. 


निफ्टी बॅंक निर्देशांक 884 अंकांनी घसरला तर निफ्टी आयटी निर्देशांक मागील दोन वर्षातली सर्वात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. बीएसईची मार्केट कॅप 6 लाख कोटींनी घसरल्याने गुंतवणूकदारांना जोरदार फटका बसल्याचं चित्र होतं.