नवी दिल्ली : सीबीआय संचालक आलोक वर्मा भ्रष्टाचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. केंद्रीय सतर्कता आयोगचा सीलबंद रिपोर्ट आणि आलोक वर्मा यांचं सीलबंद उत्तर मीडियाला कसं मिळालं? असा प्रश्न विचारत वर्मा यांचे वकील फली नरीमन यांना सरन्यायाधीशांनी फटकारले. तुम्ही सुनावणी घेण्याच्या लायकीचे नाहीत, अस म्हणत रंजन गोगाई यांनी लीक झालेल्या रिपोर्टबाबत नाराजी व्यक्त केली.
सीबीआयच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही मिनिटात सुनावणी आटोपून, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 29 नोव्हेंबरपर्यंत सु्नावणी पुढे ढकलली.
सर्वोच्च न्यायालयाने वर्मा यांना सीवीसी रिपोर्टवर सीलबंद पाकिटात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर वर्मा यांनी सोमवारी सीवीसी रिपोर्टवर उत्तर सादर केले. मात्र सीवीसीचा रिपोर्ट आणि वर्मांचं सीलबंद उत्तर प्रसारमाध्यमांना मिळाले होते.
सुनावणी सुरु होताच रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने फली नरीमन यांच्यासमोर मीडिया रिपोर्ट ठेवला. तसेच हा पाकीटबंद रिपोर्ट फुटला कसा ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आलोक वर्मा यांच्या वकिलांनी उडवाउडवीचे उत्तरं दिली.
"आम्ही तुम्हाला आलोक वर्मांचे वकील म्हणून नाही, तर एक ज्येष्ठ आणि सन्मानीय वकील म्हणून सीवीसीचा रिपोर्ट दिला होता," असं म्हणत फली नरिमन यांना सरन्यायाधीशांनी सुनावलं. कोर्ट तुमचं ऐकण्यासाठी नाही, तर कायद्याचं ऐकण्यासाठी आहे. कोर्टाला सीबीआयचं अवमूल्यन करायचे नाही, मात्र सतत काही गोष्टी समोर येत आहेत, असं रंजन गोगोई म्हणाले.
सोमवारीच रिपोर्ट दाखल करायचा होता, तर अतिरिक्त वेळ का मागितली? असा प्रश्न सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आलोक वर्मा यांच्या वकिलांना विचारला. याबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचे वकील नरीमन यांनी सांगितले. यावर तुमची याचिका सुनावणीच्या लायकीची नाही, असा राग व्यक्त करत रंजन गोगोई यांनी सुनावणी 29 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली.
सीबीआय वाद : आलोक वर्मांच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी फटकारले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2018 03:14 PM (IST)
सीबीआयच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही मिनिटात सुनावणी आटोपून, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 29 नोव्हेंबरपर्यंत सु्नावणी पुढे ढकलली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -