GAIL Director Arrested: केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने (CBI) आज गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) चे विपणन संचालक ई एस रंगनाथन यांना अटक केली आहे. लाच घेऊन पेट्रो उत्पादनांमध्ये सूट दिल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. याप्रकरणी आरोपींच्या घरावर टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी रिमांडवर घेण्यात येणार आहे.


सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेलचे विपणन संचालक ई.एस. रंगनाथन यांच्या नोएडा येथील घरावर ही छापेमारी करण्यात आली. यावेळी त्यांना 1 कोटी 25 लाखांहून अधिक किंमतीची रोकड आणि सुमारे 1 कोटींचे दागिने मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकला आहे. सीबीआयने या प्रकरणी विविध फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गेलच्या विपणन संचालकासह मध्यस्थ आणि एका खासगी कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली होती. यानंतर सीबीआयने या प्रकरणी शनिवारी नोएडा, दिल्ली आणि चंदीगडसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. 


गेलचे विपणन संचालक ई एस रंगनाथन यांच्या नोएडा सेक्टर 62 मधील घरावर छापे टाकले असता, 1 कोटी 25  रुपयापेक्षा जास्त किंमतीची रोकड सापडली आहे. तसेच 1 कोटींचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. याचबरोबर लाचेसासाठी घेतलेले 10 लाख रुपये आणि 84 लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत.
 
अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त 


सीबीआयने टाकलेल्या या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. सीबीआयने या प्रकरणी दोन मध्यस्थांसह खासगी कंपन्यांच्या तीन अधिकाऱ्यांना शनिवारी अटक केली होती. म्हणजे शनिवारी याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर छापेमारी आणि चौकशी केल्यानंतर सीबीआयने आज सकाळी गेलचे विपणन संचालक रंगनाथन यांनाही अटक केली. आता सीबीआय या सहाही आरोपींना दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर करून कोठडीत ठेवणार आहे. लाचखोरीच्या धंद्यात आणखी कोण कोण सामील होते हे सीबीआयला जाणून घ्यायचे आहे. छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.


महत्त्वाच्या बातम्या: