Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 71 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 314 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ओमायकॉनच्या रुग्णसंख्येतसुद्धा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे  7 हजार 743 रुग्ण आढळून आले आहेत.


काल देशभरात नवीन कोरोना रुग्णांची ही 2, लाख 68 हजार 833 झाली होती. तर आज त्यामध्ये 2 हजार 369 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर काल देशात 402 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 15 लाख 50 हजार 377 झाली आहे.  तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 4 लाख 86 हजार 66 जणांचा मृत्यू झाला आहे.  काल दिवसभरात 1 लाख 38 हजार 331 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर देशात आत्तापर्यंत 3 कोटी 50 लाख 85 हजार 721 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 


सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. ज्या लोकांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात 156 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात 66 लाख 21 हजार 395 लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 156 कोटी 76  लाख 15 हजार 454 लसींचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, देशात दिवसेंदिवस ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 7 हजार 743 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तर दुसरा क्रमांक हा दिल्लीचा लागतो. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 42 हजार 462 नव्या रुग्णांची भर झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 646 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलगपणे राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात काल दिवसभरात 125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत  राज्यात 1 हजार 730 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 879 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: