भारतीय सैन्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडीओ मेंढर सेक्टर भागातील आहे. या ऑपरेशनमध्ये सैनिकांनी पाकिस्तानी चौक्यांसह अनेक बंकर देखील उद्ध्वस्त केले आहेत.
लष्कर मुख्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराच्या स्थानिक कमांडर्सना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे.
यंदा म्हणजे गेल्या 50 दिवसात एलओसीवर भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात किमान 20 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर सहाहून अधिक पाक सैनिक जखमी झाले.
भारतीय सैन्याच्या गोळीबारामुळे पाकिस्तानने एलओसीजवळील त्यांच्या परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास सोपे जावे म्हणून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराकडून एलओसीवर ‘प्रो-अॅक्टिव्ह ऑपरेशन्स’ चालवलं जात आहे.
पाहा व्हिडीओ :