Viral Video: देशाच्या अनेक भागात नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या नागरिकांना वीजपुरवठा खंडित होण्याचाही फटका बसत आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याचीही चर्चा आहे, अशा परिस्थितीत विजेचे संकट आणखी वाढू शकते.


या सगळ्यात वीज कपातीचा मुद्दा सोशल मीडियावर खूप गाजत आहे. यूजर्स वेगवेगळ्या प्रकारचे मजेशीर मीम्स शेअर करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. #PowerCut, #PowerCrisis आणि #CoalShortage हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. चला पाहूया काही मजेदार मीम्स...


आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती स्वतःच्या हाताने पंख्याचा पाते फिरवून हवा घेण्याचा प्रयत्न करत आहे.


 






एका यूजरने म्हटले, 'या उष्णतेने पार मारलं.' त्याचवेळी आणखी एका यूजरने म्हटले आहे की, 'या कडक उन्हात विजेशिवाय जगणे कठीण आहे.'


दरम्यान, दिल्ली-एनसीआर, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यासह अनेक राज्यांतील लोक वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. केंद्राबरोबरच राज्य सरकारेही आपापल्या स्तरावरुन या समस्येचे समाधान करण्यात व्यस्त आहेत, मात्र अद्याप फारसे यश मिळालेले नाही. दुसरीकडे, देशातील विविध राज्यांतील विजेचे संकट पाहता, कोळशाची उपलब्धता वेळेवर व्हावी, म्हणून रेल्वेने 42 पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. कडाक्याच्या उन्हात विजेची मागणी विक्रमी पातळीपर्यंत वाढल्याने येत्या काही दिवसांत विजेचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोळशाच्या टंचाईचा सामना करणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पांवरही ताण वाढला आहे.


महत्वाच्या बातम्या: 


Temple Demolition: मंदिर पाडणे हा हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न आहे: प्रवीण तोगडिया


General Manoj Pandey : कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार : मनोज पांडे