10th Result : न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याने दहावीची परीक्षा दिली असून, अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्याला 64 टक्के गुण मिळाले आहेत. मनोज असे या कैद्याचे नाव आहे. उत्तर प्रदेश मधील शाहजहांपूरच्या न्यायालयाने मनोज याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या कैद्याने यूपी बोर्ड हायस्कूलची परीक्षा दिली होती. त्यात तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. 


शहाजहानपूर कारागृहाचे अधीक्षक बी.डी. पांडे यांनी सांगितले की, एका पाच वर्षांच्या निष्पाप मुलाच्या हत्येप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मनोज नावाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतरही मनोजने तुरुंगातूनच शिक्षण घेत हायस्कूलची परीक्षा दिली. त्यामध्ये तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. 


उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या हायस्कूल परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. कारागृह अधीक्षकांनी सांगितले की, कैदी मनोज यादव हा पोलीस स्टेशन कलान परिसरातील रहिवासी असून त्याने 28 जानेवारी 2015 रोजी अनमोल या पाच वर्षांच्या चिमुरड्याला गोळ्या घालून ठार मारल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला 24 नोव्हेंबर 2021 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.


शिक्षा सुनावण्यापूर्वी मनोजने तुरुंगातूनच दहावीचा फॉर्म भरला होता. मात्र फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने आपले शिक्षण सोडले. पांडे यांनी सांगितले की, आम्ही त्याला परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यास प्रवृत्त केले आणि नंतर त्याने अभ्यास केला व 64 टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. कारागृह अधीक्षकांनी मनोजला अभ्यास करण्याची व्यवस्था केली होती. शिवाय वेळोवेळी त्याची भेट घेऊन अभ्यासाची माहिती घेतली."


यूपी बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावर्षी, 51,92,689 विद्यार्थ्यांनी यूपी बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत नोंदणी केली होती. त्यापैकी 47,75,749 विद्यार्थी बसले होते.  


महत्वाच्या बातम्या


Job Majha : दहावी उत्तीर्ण आणि पदवीधारकांसाठी नोकरीच्या संधी, 'या' ठिकाणी करा अर्ज


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI