हॉस्पिटलनं जुन्या नोटा नाकारल्या, सदानंद गौडांना नोटबंदीचा फटका
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2016 07:50 AM (IST)
बंगळुरु : नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका केंद्रीय सांख्यिकीमंत्री सदानंद गौडा यांनाही बसला आहे. भावाचा मृतदेह आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या गौडांना जुन्या नोटा नाकारल्याचा अनुभव आला आहे. मंगळुरुच्या कस्तुरबा मनिपाल हॉस्पिटलमध्ये भावाचा मृतदेह आणण्यासाठी सदानंद गौडा गेले होते. पण हॉस्पिटलने जुन्या घेण्यास नकार दिल्यानं सदानंद गौडांना पर्यायी व्यवस्था करावी लागली आहे. विशेष म्हणजे 24 नोव्हेंबरपर्यंत सर्व रुग्णालयांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनाच हा अनुभव आल्यानं हॉस्पिटलच्या मुजोरीवर सरकार काय कारवाई करतं हे पाहावं लागेल. सरकारच्या या निर्णयाचं पालन होत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. केंद्रीय मंत्र्याबाबतच असं घडत असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित झालाय. नुकताच पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये चेक न स्वीकारल्यानं एका नवजात बालकाला आपला जीव गमावावा लागला होता.