नवी दिल्ली : केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी राजीनामा दिला असून केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही आपला राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांच्या आदेशानंतर रुडी यांनी राजीनामा दिल्याची माहिती समजते आहे. रुडी यांच्या कामगिरीवर पंतप्रधान मोदी नाराज असल्यानंच त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे उमा भारती यांनी प्रकृतीचं कारण पुढे करत मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला आहे.
2019 साली निवडणुका असून भाजपनं आतापासूनच त्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी काही मंत्र्यांवर पक्षातील महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे राजीव प्रताप रुडी यांच्यावर कोणती कामगिरी सोपवण्यात येणार याकडेही अनेकांचं लक्ष आहे. रुडी हे बिहारमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
उमा भारतींकडून राजीनामा सादर
उमा भारती यांनी राजीनामा सादर केला असला तरीही त्याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. त्याबाबत पंतप्रधान मोदीच निर्णय घेतील.
या मंत्र्यांच्या कामगिरी मोदी नाराज
सुत्रांच्या मते, रुडी आणि उमा भारती यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी नाखूश होते. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांची मंत्रिपदावरुन उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. उमा भारती या जल संधारण मंत्री आहेत.
काही दिवसांपूर्वीच सुरेश प्रभूंनीही राजीनामा सादर केला होता
काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दोन रेल्वे अपघातानंतर आपला राजीनामा सादर केला होता. पण त्यावेळी पंतप्रधान मोदींनी राजीनाम न स्वीकारता काही वेळ थांबा असं त्यांना सांगितलं होतं.
दरम्यान, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे राजीनामे घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी नेमकी कुणाची वर्णी लागणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडींचा राजीनामा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2017 10:42 PM (IST)
केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी राजीनामा दिला असून केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही आपला राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -