नवी दिल्ली : बारा वर्षांखालील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्यांना आता मृत्युंदड ठोठवण्यात येणार आहे. दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत 'पॉक्सो' कायद्यातील तरतुदींना केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
देशभरात लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बारा वर्षांखालील बालक किंवा बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता कठोर शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. लहानग्यांवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर बारा वर्षांखालील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केली होती.
यापूर्वी, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्याचं विधेयक मंजूर केलं होतं.
बारा वर्षांखालील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Dec 2018 05:40 PM (IST)
बारा वर्षांखालील बालक किंवा बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता कठोर शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. लहानग्यांवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -