नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारनं आज एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा फायदा जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना होणार आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या काळासाठी हा महागाई भत्ता वाढवून मिळणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच महागाई भत्तात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही वाढ करण्यात आल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
तीन ते चार महिन्याआधी महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. तर आता देखील यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.