शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2017 04:31 PM (IST)
शिमल्यात एका भीषण अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी बस दरीत कोसळून ही दुर्दैवी घटना घडली.
फोटो : पीटीआय
शिमला (हिमाचल प्रदेश) : शिमल्यात एका भीषण अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी बस दरीत कोसळून ही दुर्दैवी घटना घडली. आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. सध्या दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. तर गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किन्नौरमधून ही बस सोलनला जात होती. त्यावेळी ही बस दरीत कोसळली.