VIDEO : मोदींच्या ताफ्यासमोर बैलांची झोंबी
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2018 02:42 PM (IST)
उपस्थित पोलिसांनी बैलांना बाजूला केल्यानंतर पंतप्रधान मोदीची गाडी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाड्या पुढे रवाना झाल्या.
वाराणसी : उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर दोन बैलांची झोंबी झाल्याचा प्रकार घडला. मोदी वाराणसी दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. परवा रात्री दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा केंट रेल्वे स्टेशनकडे निघाला होता. या दरम्यान रस्त्यातच दोन बैलांची झोंबी झाली. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा काही वेळ थांबवण्यात आला. उपस्थित पोलिसांनी बैलांना बाजूला केल्यानंतर पंतप्रधान मोदींची गाडी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाड्या पुढे रवाना झाल्या. देशाचे पंतप्रधान ज्या मार्गाने जात आहेत, त्या मार्गावरील सुरक्षेत इतका ढिसाळपणा कसा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पाहा व्हिडीओ :