Prophet Muhammed Row : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. देशभरात त्यांच्याविरोधात निदर्शने होत आहेत. परदेशातून देखील या प्रकरणी भारतावर टीका होत आहे. आक्षेपर्ह वक्तव्यामुळे भाजपने शर्मा यांना पक्षातून काढून टाकले आहे. शिवाय देशभरात विविध ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यातच आता शर्मा यांच्या विरोधात भडकाऊ पोस्ट करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. 


उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये सोशल मीडियावर नुपूर शर्माशी संबंधित प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप असलेल्या नदीमवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो नुपूर शर्माचा शिरच्छेद करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एडिट करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 


नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त टिप्पणी केली होती.  त्यानंतर देशभरात निदर्शने आणि हिंसाचार होत आहे. या एपिसोडमध्ये बुलंदशहरच्या सियाना पोलीस स्टेशन हद्दीतील खानपूर भागातील नदीम नावाच्या तरुणाने फेसबुकवर नुपूर यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट शेअर केली होती. 


उत्तर प्रदेश पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आरोपी तरुणाला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर एसपी सिटी सुरेंद्र नाथ तिवारी म्हणाले की, खानापूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी तरुण नदीमला अटक केली. पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 


नुपूर शर्माविरुद्ध पश्चिम बंगाल, दिल्ली, मुंबई, ठाणे आणि पायधोनी येथेही गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्माला समन्स बजावले आहे. ठाणे पोलिसांनी नुपूरला 22 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. पायधोनी येथे नुपूर शर्मा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रझा अकादमीने त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता.


महत्वाच्या बातम्या


Prophet Muhammed Row : नुपूर शर्मांच्या आडचणीत आणखी वाढ, पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल