भोपाळ : मध्य प्रदेशच्या मंदसौर येथील भनपूर भागात जुनी इमारत कोसळली. अक्षरश: पत्त्यांप्रमाणे कोसळणाऱ्या इमारतीचे चित्तथरारक दृश्य कॅमेरात कैद झालं आहे.

इमारत कोसळण्याआधीच पोलिसांनी इमारत रिकामी केली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भविष्यात या ठिकाणी पुन्हा दुर्घटना होऊ नये, यासाठी संपूर्ण इमारत तोडली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.