याप्रकरणी हार्दिक पटेलसह आणखी दोघांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामध्ये लालजी पटेल यांचाही समावेश आहे. त्यांनाही दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. तिघांना दोषी धरलं असलं तरी अन्य 14 जणांना दोषमुक्त केलं आहे. विसनगर जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला.
23 जुलै 2015 रोजी भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात हा हिंसाचार उफाळला होता. त्यावेळी आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली होती.
हार्दिक पटेलचा 24 जुलैचा ट्विट
हार्दिक पटेलने कालच एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं, “गुजरातमध्ये आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीसाठी 25 ऑगस्टपासून अहमदाबादमध्ये बेमुदत उपोषण. आमचा विजय संकल्प आहे. सरकारला जनतेच्या मूलभूत अधिकारांसमोर झुकावं लागेल. युवकांना अधिकार मिळो, शेतकऱ्यांना सन्मान मिळो”