नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. त्या दिवशी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सामान्य जनतेला या अर्थसंकल्पाची माहिती घेता यावी यासाठी आता केंद्र सरकारने एक मोबाईल अॅप लॉन्च केलं आहे. त्या माध्यमातून इंग्रजी आणि हिंदी भाषेत या अर्थसंकल्पाची माहिती मिळणार आहे. या अॅपचं नाव युनियन बजेट मोबाईल अॅप असं आहे.


अर्थसंकल्पाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. संसदेत अर्थसंकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर लगेच या अॅपवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत अर्थसंकल्पाची माहिती घेता येणार आहे. त्यामुळे लोकांना आपल्या आवडत्या भाषेत अर्थसंकल्प समजावून घेता येणार आहे. 


केंद्र सरकारच्या या अॅपचं नाव युनियन बजेट मोबाईल अॅप (Union Budget Mobile App) असं आहे. या माध्यमातून अर्थसंकल्पासंबंधी सर्वात विश्वसनिय माहिती घेता येऊ शकेल. 


हे अॅप कसं डाऊनलोड करायचं? 
युनियन बजेट मोबाईल अॅप हे http://indiabudget.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येऊ शकेल. तसेच गुगल प्ले स्टोअरवरुनही हे अॅप डाऊनलोड करता येऊ शकेल. 


डिजिटल संसद अॅप वरही माहिती मिळणार
केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती ही डिजिटल संसद अॅप (Digital Sansad App) यावरही उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून अर्थसंकल्पाचे लाईव्ह अपडेट पाहता येईल. या अॅपच्या माध्यमातून संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे. या अॅपवर 1947 सालापासून ते आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाची आणि त्यावरील चर्चांची माहिती मिळू शकते. 


महत्त्वाच्या बातम्या: