Union Budget 2021 : देशाचा अर्थसंकल्प यंदाच्या वर्षी पूर्णपणे पेपरलेस आहे. प्रथमच आहे जेव्हा Android आणि iOS स्मार्टफोनसाठी स्वतंत्र युनियन बजेट अ‍ॅप बाजारात आणले गेले आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अॅप गूगल प्ले स्टोअरवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे तर आयफोन वापरकर्त्यांसाठी अॅपल अॅप स्टोअरवर फ्री डाऊनलोड करता येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अद्ययावत कागदपत्रे या अ‍ॅपवर मिळू शकतात.


केंद्र सरकारने प्रतिकात्मक 'हलवा सोहळा'च्या वेळी Union Budget Mobile अॅप सुरू करण्याची घोषणा केली होती. हे अ‍ॅप Android Version 5 आणि त्यावरील व iOS 10 आणि त्यावरील फोनमध्ये सपोर्ट करतं. या अ‍ॅपच्या मदतीने यूजर्स बजेटशी संबंधित माहिती आणि कागदपत्र मिळवू शकणार आहेत. नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) आर्थिक व्यवहार विभागाच्या (डीईए) सहकार्याने हे अ‍ॅप तयार केले आहे.


Union Budget Mobile अॅप कसं डाउनलोड करणार?




  • सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवरील Google Play Store किंवा अॅपल अॅप स्टोअरवर जा.

  • आता Union Budget Mobile सर्च करा.

  • येथे एनआयसी ई-सरकारद्वारे विकसित केलेले Union Budget Mobile अ‍ॅप सिलेक्ट करा.

  • नंतर Install बटणावर क्लिक करा.

  • याशिवाय तुम्ही www.indiabudget.gov.in या वेबसाइटवर जाऊन अ‍ॅप लिंकवर क्लिक करू शकता.


Union Budget Mobile अॅपच्या महत्त्वाच्या गोष्टी




  • या अ‍ॅपवर प्रवेश करण्यासाठी लॉगिन किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

  • अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांना सपोर्ट करतं.

  • डॉक्युमेंट्स डाउनलोड करण्याव्यतिरिक्त, यूजर हे डॉक्युमेंट प्रिंट, सर्च, झूम इन आणि झूम आऊट करू शकतात.

  • याशिवाय बाय-डायरेक्शनल स्क्रोलिंग देखील उपलब्ध आहे.

  • बजेटशी संबंधित सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रोवईट करण्याशिवाय, ते पीडीएफ स्वरूपातही डाउनलोड देखील करता येणार आहेत.