राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून गेल्या काही वर्षांत सोशल मिडीयाचा आपली भुमिका मांडण्यासाठी आणि प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. तरी देखील मायावती या इतके दिवस सोशल मिडीयापासून दुर होत्या. परंतू आता 2019 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना मायावती ट्विटरवर आल्या आहेत.
मायावती यांच्या अकाउंटवरून पहिले ट्विट 22 जानेवारीला करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी @sushrimayawati हे त्यांचे ऑफिशियल ट्विटर अकाउंट असल्याचं म्हटलं आहे. मायावतींचं हे ट्विटर अकाउंट वेरिफाइड असून 13 हजार पेक्षा जास्त लोकांनी त्यांना आतापर्यंत फॉलो केलं आहे.
लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी मायावतींचे ट्विटरवर स्वागत केले आहे. "13 जानेवारीला लखनौ येथील सभेदरम्यान तेजस्वी यांनी मायावतींना ट्विटरवर येण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेतल्याचा आनंद वाटला", असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.