नवी दिल्ली : काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी नुकत्याच परदेशातून भारतात परतल्या आहेत. दिल्लीत परतल्यानंतर मंगळवारी त्या आशीष यादव या दिव्यांग मुलाची भेट घेण्यासाठी दिल्लीतील क्लस्टर हाउसिंग जवळील झोपडपट्टीत गेल्या होत्या.

प्रियांका गांधी-वाड्रा यांनी सोमवारी परदेशातून परतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या तुघलक रोडवरील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला असलेल्या क्लस्टर हाउसिंग येथे त्यांनी भेट दिली. आशीष यादव या दिव्यांग मुलाला भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या.  "प्रियंका गांधी दर दोन महिन्यांनी भेटण्यासाठी येतात. गेल्या ३-४ वर्षांपासून आशिषच्या उपचारासाठी त्या मदत करत आहेत", असं यावेळी आशीषचे वडिल सुभाष यादव यांनी सांगितलं.


काँग्रेस मुख्यालयात प्रियांका गांधींना कक्ष मिळाला, नावाची पाटीही लागली!

काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका आता सक्रिय राजकारणात आल्या आहेत. काँग्रेस मुख्यालयात नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. राहुल गांधी उपाध्यक्ष असताना त्यांच्यासाठी जो कक्ष होता तोच प्रियांका गांधी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महासचिव असल्या तरी त्या इतर महासचिव यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत हे स्पष्ट होतं.