जम्मू-काश्मीर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सीमेवर बीएसएफचे जवान पाकिस्तानी सैन्याला मिठाई वाटतात. पण यंदा असं होणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, बीएसएफने यावेळी पाकिस्तानी रेन्जर्सना मिठाई न देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सीमेवर सातत्याने सुरु असलेल्या गोळीबारामुळे बीएसएफने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी गुरुवारी (25 जानेवारी) पाकिस्तानी रेंजर्स आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्यात फ्लॅग मीटिंग झाली होती होती. पाकिस्तानच्या विनंतीवरुन झालेल्या या मीटिंमध्ये दोन्ही देशांकडून सेक्टर कमांडर स्तराचे अधिकारी सहभागी झाले होते. सुचेतगड परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेवर ही फ्लॅग मीटिंग झाली होती.

पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघ केलं जात होतं. यामध्ये भारताच्या सात नागरिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर गोळीबार झाला होता. बीएसएफनेही पाकिस्तानच्या भ्याड कृत्याचं सडेतोड उत्तर दिलं होतं. यामध्ये पाकिस्तान मोठं नुकसान झालं होतं.

2017 मध्ये एकूण 860, 2016 एकूण 271 आणि 2015 मध्ये एकूण 387 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचा उल्लंघन झालं होतं. आंतरराष्ट्रीय बॉर्डर आणि एलओसीवर पाकिस्तान सातत्याने गोळीबार करत आहे. भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये 61 भारतीय सैनिक शहीद झाले होते.