Brahmos Missile : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ब्राह्मोस मिसाइल गेल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर वायु दलानं कारवाई केली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना कामावरुन बर्खास्त करण्यात आले आहे. 9 मार्च 2022 रोजी भारतामधून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात ब्राह्मोस मिसाइल गेली होती. याप्रकरणी कोर्ट ऑफ इंक्वायरी करण्यात आली. त्यासाठी एक तपास पथक नेमण्यात आले होते. पाकिस्तानच्या हद्दीत ब्राह्मोस मिसाइल गेल्याप्रकरणी तीन अधिकारी दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर वायु दलाकडून कारवाई करण्यात आली असून त्यांना सेवेतून बर्खास्त करण्यात आले आहे. या तीन अधिकाऱ्यांमध्ये ग्रुप कॅप्टन (Group Captain), एक विंग कमांडर (Wing Commander) आणि एक स्क्वाड्रन लीडर (Squadron Leader) यांचा समावेश आहे.
9 मार्च 2022 रोजी संरक्षण दलाच्या हरियाणा येथील तळावरून ब्राह्मोस क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात गेले होते. या घटनेनंतर पाकिस्तानमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या घटनेची दखल घेतली होती. दरम्यान, याप्रकरणी भारतीय सरंक्षण दलाने वायुसेनेच्या तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बर्खास्त करण्याची कारवाई केली आहे.
भारतीय वायु सेनाने अशी माहिती दिली की, केंद्र सरकारने या प्रकरणात दोषी आढळलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ नौकरीवरुन बर्खास्त केलं आहे. मंगळवार 23 ऑगस्ट 2022 पासून त्यांना कामावरुन काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 9 मार्च 2022 रोजी ब्रह्मोस मिसाइल मिसफायरिंगची घटना घडली होती. क्षेपणास्त्र डागण्यासाठीच्या निश्चित कार्यपद्धतीची अंमलबजावणी न केल्यामुळे ही चूक घडली होती. या प्रकरणामध्ये तीन अधिकारी दोषी आढळले आहेत. या तिन्ही अधिकाऱ्यांची सेवा तात्काळ सम्पात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
दरम्यान, ब्राह्मोस मिसाइल अचानक हद्दीत डागल्याचं लक्षात येताच पाकिस्तानकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. ब्राह्मोस मिसाइल हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हवाई हद्दीत तब्बल 100 किमी आत आल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. त्या वेळी 40000 फूट उंचीवरुन आणि ध्वनीच्या वेगापेक्षी तिप्पट वेगाने या क्षेपणास्त्र हद्दीत पडले होते. कारण यात कोणताही वॉरहेड नव्हता. त्यामुळे याचा स्फोट झाला नाही, असेही पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. पाकिस्तानकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच याबाबत योग्य तो तपास करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली होती.
आणखी वाचा :
Indigo Flight: रन वेवर इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांची सुटका
कार, दुचाकीनंतर आता इलेक्ट्रिक बसलाही मोठी मागणी! सार्वजनिक वाहतुकीमध्ये महाराष्ट्रासह 'हे' राज्य करणार इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश