नवी दिल्ली : आज पहाटे 3.30 वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 200 ते 300 अतिरेकी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अनेकांनी भारतीय जवानांचे कौतुक केले. तर अनेकांनी भारतीय जवानांचं कौतुक करताना पाकिस्तानला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. 'द बॉईज प्लेड रियली वेल' अशा मथळ्याखाली अनेकांनी सोशल मीडियावर भारतीय हवाई दलाचं अभिनंदन केलं. माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेदेखील याच ट्रेण्डचा वापर करत पाकिस्तानला ट्रोल केले आहे.


काही पाकिस्तानी क्रिकेटर्सना नीट इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे हे पाकिस्तानी खेळाडू सामना जिंकल्यानंतर समलोचकांशी इंग्रजीत बोलावं लागेल म्हणून त्यांच्यासमोर जाणं टाळतात. तर काहीजण एक-दोन इंग्रजी वाक्य बोलून 'द बॉईज प्लेड रियली वेल' असं वाक्य बोलतात. त्यामुळे या खेळाडुंना, परिमाणी पाकिस्तानी टीमला नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. आज भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर अनेकांनी पाकिस्तानला ट्रोल करण्यासाठी याच वाक्याचा वापर केला.

VIDEO :  मिराजच्या हल्ल्यात तब्बल 200 अतिरेकी ठार | श्रीनगर | एबीपी माझा



दरम्यान, आज भारतीय हवाई दलाने निंयत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानमधील बालाकोट भागात एअर स्ट्राईक केला. अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर 1 हजार किलो स्फोटकं फेकली. यामध्ये जवळपास 250 अतिरेकी ठार झाले आहे.