सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीच्या तिलकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी रोहित तोमर हा एका पोलिस उपनिरीक्षकाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो एका तरुणीला लग्नासाठी जबरदस्ती करत होता. तसंच हा मारहाणीचा व्हिडीओ दाखवून तुझीही अशीच अवस्था करेन अशी धमकी देत होता.
कंटाळलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी रोहित तोमरला अटक केली आहे.
पाहा व्हिडीओ |