Corona Booster Dose : सध्या कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दुसरी लस घेतल्यानंतर नऊ महिन्यांनंतर तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस देण्यात येत आहे. दुसरा डोस आण बूस्टर डोस यातील अंतर कमी करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे.  आता या मागणीची दखल घेत आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यासाठी हा कालावधी 90 दिवसांवर आणला आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पत्राद्वारे  ही माहिती दिली आहे.
 
तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार, आता आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या गरजू व्यक्तिंनादेखील बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे आंतराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांना ज्या देशात जायचे आहे त्या देशातील नियमांनुसार लस देण्यात येणार आहे. परदेशी जाणाऱ्या व्यक्तिंना दुसरा डोस घेतल्याच्या 90 दिवसांनंतर तिसरा डोस घेता येणार आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 


कोविन अॅपमध्येदेखील बदल


कोविन अॅपसह संबंधित संगणकीय प्रणालीमध्येदेखील आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले आहेत. बूस्टर डोससंदर्भातील सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खासगी लसीकरण केंद्रांनी याची नोंद घ्यावी व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येत आहेत. 


कोणाला मिळणार बूस्टर डोस


आरोग्य कर्मचारी , आघाडीवर काम करणारे कर्मचारी व वय वर्ष 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना सदर बुस्टर डोसची सुविधा शासकीय व महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मिळेल‌. तसेच 18 वर्षे ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना खाजसी लसीकरण केंद्रावर सदर सुविधा उपलब्ध असेल. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांनी बुस्टर डोस वेळच्यावेळी घेण्याचे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. 


कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या किमती घटवल्या


सीरम इन्स्टिट्यूकडून उत्पादित  करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे दर कमी करण्यात आली आहे. सीरमने खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे दर हे तब्बल 375 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आता  225 रुपयांना मिळणार आहे. सोबतच भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी  देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता 1200 वरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


संबंधित बातम्या


Corona Booster Dose: आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना 'बूस्टर'; लसींच्या किमतीही घटल्या


Covid 19 Precaution Dose : बूस्टर डोस घ्या... पण कसा? नोंदणीपासून किमतीपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर