Delhi-Pune Vistara flight : दिल्ली-पुणे विस्तारा विमानात (Delhi-Pune Vistara flight) बॉम्बची धमकी (Bomb threat)दिल्याची घटना घडली आहे. ही घटना दिल्ली विमानतळावर घडली आहे. सध्या विमानतळावर असणाऱ्या विमानाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरुप खाली उतरवण्यात आले आहे. या विमानात बॉम्ब असल्याबाबतचा कॉल आज जीएमआर कॉल सेंटरला आला होता. 


 






बातमी समजताच विमान पूर्णपणे रिकामे 


दरम्यान, दिल्ली-पुणे विस्तरा विमानात बॉम्बची धमकी दिल्यानं खबळबळ उडाली आहे. धमकी मिळाल्यानंतर घाईघाईत विमान पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आले आहे. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीएमआर कॉल सेंटरला सकाळी विमानामध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला होता. कॉल येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 


विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विमानाची झडती घेतली आहे. मात्र, झडतीनंतर विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. कॉल सेंटरमध्ये यापूर्वीही अनेकदा असे बनावट कॉल आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही. विमानातील तपास पूर्ण झाला आहे. बॉम्ब असल्याचा आलेला फोन हा बनावट होता. दरम्यान, बॉम्बची खोटी माहिती दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवले आहे. पोलिस पुढील घटनेचा तपास करत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pune NIA News : मोठी बातमी! इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँम्ब स्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर