वडोदरा (गुजरात) : गुजरातमधील वडोदरामध्ये (Gujarat, Vadodara) बोट तलावात उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत 10 विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला. या घटनेत दोन शिक्षकांचा सुद्धा मृत्यू झाला. हरणी तलावात बोट उलटली. या बोटमध्ये 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील आहेत. बचावकार्यात 13 मुलं आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आलं आहे. 






दरम्यान, राज्यमंत्री कुबेर दिंडोर यांनी सहा विद्यार्थ्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. एबीपी अस्मिताने दिलेल्या वृत्तानुसार, गंभीर जखमी झालेल्या नऊ ते दहा विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 10 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तेथे पोहोचले.






सीएम भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केले की, "वडोदराच्या हरणी तलावात बुडून मुलांची बातमी खूप दुःखद आहे. ज्यांनी जीव गमावला त्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी मी दु:खी आहे." विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो. बोटीत बसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत."






एबीपी अस्मिताने दिलेल्या वृत्तानुसार, हे सर्व विद्यार्थी वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील असून ते येथे सहलीसाठी आले होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते, त्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे. बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते.


सात एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर हरणी तलाव आहे. या तलावाचे सुशोभीकरण सन 2019 मध्ये करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या