BMW Car Accident : सध्या राज्यासह देशभरात हिट अँड रनच्या (Hit and Run Case) घटना झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आलिशान बीएमडब्ल्यू कारच्या (BMW Car Accident0 धडकेत दोन तरुणींनी आपला जीव गमावला आहे. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर आरोपीनं घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत BMW कार ड्रायव्हर गजेंद्र प्रताप सिंह याला अटक केली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भरधाव आलिशान बीएमडब्ल्यू कारनं स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरुणींना चिरडल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ धाव घेत दोन्ही तरुणींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जिथे उपचारा दरम्यान दोन्ही तरुणींचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. तसेच, पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला अटक केली आहे.
दुर्दैवी घटना मध्यप्रदेशातील इंदून येथील महालक्ष्मी नगर येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा जादौन आणि लक्ष्मी तोमर नावाच्या तरुणी जत्रेसाठी गेल्या होत्या. तिथून त्या घरी परतत होत्या. या दरम्यान, चुकीच्या रस्त्यानं येणाऱ्या भरधाव BMW कारनं स्कूटीवरुन जाणाऱ्या दोन तरुणींना धडक दिली. त्यानंतर ड्रायव्हरनं घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या मित्राच्या वाढदिवसाचा केक घेऊन घाईघाईनं चुकीच्या दिशेनं भरधाव BMW कार घेऊन जात होता. आरोपी विरोधात कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune Crime: मला नवा फोन हवाय; पैशांची जुळवाजुळव झाली नसल्यानं पती हतबल, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल