याशिवाय शेजारच्या बेचराजीमध्येही भाजपचा पराभव झाला.
उंझा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आशा पटेल यांनी भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नारायण पटेल यांच्यावर 19 हजार मतांनी मात केली. 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत 79 वर्षीय नारायण पटेल यांनी 40 वर्षीय आशा पटेल यांचा पराभव केला होता.
याचप्रमाणे बेचराजी मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार भरत ठाकोर यांनी भाजपचे उमेदवार रजनीकांत पटेल यांचा 15 हजार 811 मतांच्या फरकाने पराभव केला. रजनीकांत पटेल 2012 सालच्या निवडणुकीत याच मतदारसंघातून आमदार होते.
या निवडणुकीत पाटीदार आंदोलन आणि ठाकोर समुदायाने काँग्रेसला कौल दिल्याने चित्र बदललं. उंझा मतदारसंघातील 2.12 लाख मतदारांपैकी 77 हजार पाटीदार समाज आहे, तर 50 हजार ठाकोर समुदाय आहे.
उंझा येथील उमिया माता मंदिर प्रसिद्ध आहे, जे पाटीदार समाजाचं कुलदैवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांनीही वडनगरमध्ये रॅली काढली होती. मात्र राहुल गांधींच्याच प्रचाराला या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळालं.
गुजरात विधानसभेतील पक्षीय बलाबल
- भाजप - 99
- काँग्रेस - 77
- राष्ट्रवादी काँग्रेस - 1
- भारतीय ट्रायबल पार्टी - 2
- अपक्ष - 3
एकूण - 182