नवी दिल्ली : मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने भाजपने मेगा इव्हेंटचं आयोजन केलं आहे. 26 मे रोजी भाजपच्या प्रचार कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.  सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


दोन आठवड्यांचा हा कार्यक्रम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आहेत. केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू, पीयूश गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह काही प्रमुख मंत्र्यांची टीम कार्यक्रमाची रुपरेषा आखत आहे.

काय आहे भाजपचा मेगा इव्हेंट?

  • मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रचार कार्यक्रम

  • 26 मे रोजी या कार्यक्रमाला सुरुवात होणार

  • दोन आठवड्यांसाठी हा कार्यक्रम असेल.

  • सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, भाजपच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमात सहभागी असतील.

  • केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळणाऱ्यांसाठी लाभार्थी संमेलनाचं आयोजन

  • मुख्यमंत्री चार संमेलनांना संबोधित करु शकतात. प्रत्येक राज्यात कार्यक्रम घेण्याची योजना

  • देशभरात संमेलनासोबत पत्रकार परिषदाही होणार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना तीन वर्षाचा रिपोर्ट घेऊन प्रचाराला उतरण्याचे आदेश दिले

  • येत्या दोन दिवसात प्रचार कार्यक्रमाची अंतिम रुपरेषा तयार होईल

  • पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं नियोजन

  • जनतेकडून मिळालेल्या सूचनांनुसार कार्यक्रम आखण्याचा मोदींचा विचार

  • केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू, पीयूश गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह काही प्रमुख मंत्र्यांची टीम कार्यक्रमाची रुपरेषा आखणार