संजय गांधींचे सुपुत्र वरुण गांधींना भाजपमध्ये फारसे महत्व नसल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. वरुण गांधींना भाजपमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नाही. पक्षात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. तसेच त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमताही आहे. पण भाजपमध्ये त्यांना फारसं महत्व दिलं जात नाही. असं स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
उत्तर प्रदेशमधील एका काँग्रेस नेत्याच्या मते, प्रियंका गांधी आणि वरुण गांधी यांच्यात सुरुवातीपासूनच चांगले संबंध आहेत. त्यामुळे वरुण गांधींना काँग्रेसमध्ये आणण्यास प्रियंका मोठी भूमिका बजावू शकतात.
दरम्यान, एकीकडे ही चर्चा सुरु असली तरीही राहुल गांधी किंवा वरुण गांधी यांच्याकडून यासंबंधी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे वरुण गांधी भाजप सोडून काँग्रेसवासी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वरुण गांधी हे उत्तरप्रदेशच्या सुलतानपुरातून ते भाजपचे खासदार आहेत.
संबंधित बातम्या :
‘या’ तरुणांना राजकारणात 20 टक्के आरक्षण द्या : वरुण गांधी