नवी दिल्ली: भाजपचे आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या ड्रामेबाजीमुळं दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये चांगलाच हशा पिकला. सभागृहात टँकर घोटाळ्यावर चर्चा सुरू होती. त्यात अरविंद केजरीवालांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये पती-पत्नीचं नातं असल्याचा आरोप केला.


 

दरम्यान, हे सगळं घमासान सुरू असताना बोलण्याची संधी न मिळाल्यामुळं आमदार विजेंद्र गुप्ता चक्क बाकावर उभे राहिले. विजेंद्र गुप्ता यांची शाळेतल्या मुलाप्रमाणं सुरू असलेली वर्तणुक पाहून सभागृहातील आमदारांना हसू आवरलं नाही.

 

पहिल्या बाकावर बसलेले अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया तर विजेंद्र गुप्तांचा तो पवित्रा पाहून जोरजोरात हसत होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी वारंवार विनवणी केल्यानंतर विजेंद्र गुप्ता बाकावरून खाली उतरले आणि पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाली.